महाराष्ट्र राज्य सरकार ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 नावाची एक नवी योजना 1 जुलै 2024 रोजी सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे की महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत देणे. या योजने मध्ये आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये त्याच्या बँक खात्या मध्ये जमा होतील.
महाराष्ट्र सरकार ऑनलाईन आणि ऑफलाईन द्वारे Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply फॉर्म भरून घेत आहे. पात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा या साठी महाराष्ट्र सरकार ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रक्रिये द्वारे आमंत्रित करत आहे. तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातील महिला असाल किंवा तुम्ही दुसऱ्या राज्याच्या असाल पण लग्न झाल्या नंतर तुम्ही महाराष्ट्र मध्ये स्थायिक झाला असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या लेख पूर्ण पणे वाचा.
या मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 काय आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे आणि या योजने साठी कोण कोण पात्र आहे याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे. हे तुम्हाला योजना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करेल आणि तुमच्यासाठी अर्ज करणे आणि लाभ मिळवणे सोपे करेल.
Mukhyamantri Maji Ladki Bahin Yojana Online Apply
महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या मागील महिन्यात झालेल्या बजेटमध्ये महिलांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ या नावाच्या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील कमी उत्पन्न असलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेअंतर्गत या वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. राज्यभरातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत. सरकारने सर्व समस्या सोडवून योजनेत सुधारणा केल्या आहेत. Mukhyamantri Maji Ladki Bahin Yojana Online Apply हे कसे करायचे हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचत रहा.
Mukhyamantri Maji Ladki Bahin Yojana या साठी कोणत्या महिला पात्र ?
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply पात्र होण्यासाठी, अर्जदारांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:
1.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्ष्या कमी असावे
2.
कोणताही सदस्य आयकर दाता नसावा
3.
अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित किंवा कायम कर्मचारी नसावेत.
4.
अर्जदाराने रु. 1500 पेक्षा जास्त उपलब्ध असलेल्या कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
5.
कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी संसद सदस्य (MP)
किंवा विधानसभेचे सदस्य (MLA) नसावेत.
6.
अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत नसावी.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana साठी लागणारे कागदपत्रे
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल:
1.
महिलेचे आधार कार्ड
2.
महिलेचा जन्माचा दाखला किंवा 15 वर्षा पूर्वीचा शाळा सोडलेल्या दाखला किंवा 15 वर्षा पूर्वीचे मतदान कार्ड
3.
महिलेचा उत्पन्नाचा दाखला 2.50 लाखा पेक्ष्या कमी असलेला किंवा महिलेचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
4.
महिलेचा पासपोर्ट साइज फोटो
5.
महिला जर परराज्यातील असतील तर त्या राज्यातील ओळखीचा पुरावा
Mukhyamantri
Majhi Ladki Bahin Yojana Official Website Link
जर तुम्ही मूळ महाराष्ट्रातील महिला असाल आणि Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 apply तुम्हाला हे करायचे असल्यास, तुम्ही तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप वापरून या चरणांचे अनुसरण करून सहज करू शकता:
1. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
3. मुख्यपृष्ठावर, “आता अर्ज करा” पर्यायावर क्लिक करा.
4. एक नवीन पृष्ठ उघडेल.
5. तुमचा मोबाईल नंबर आणि या पेजवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
6. “प्रोसीड” पर्यायावर क्लिक करा.
7. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अर्जाचा फॉर्म उघडेल.
8. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
9. अर्जामध्ये विचारलेली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
1. "सबमिट" पर्यायावर क्लिक करा.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Process
नारी शक्ती दूत ॲप वापरून ऑनलाइन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे
·
तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर प्ले स्टोअर उघडा.
·
प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये “नारी शक्ती दूत ॲप” टाइप करा.
·
एकदा तुम्हाला ॲप सापडल्यानंतर, ते तुमच्या डिव्हाइसवर डाउनलोड आणि स्थापित करण्यासाठी "इंस्टॉल करा" वर क्लिक करा.
·
एकदा इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या होम स्क्रीनवरून नारी शक्ती दूत ॲप उघडा.
·
ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर एंटर करा.
·
ॲपवर नेव्हिगेट करा आणि “माझी लाडली बहिण योजना” हा पर्याय निवडा.
· योजनेचा अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. सर्व माहिती बरोबर भरा.
·
फॉर्म मध्ये आपल्या कडे जे जे कागद पत्रे असतील ते वेवस्तीत अपलोड करा इमेज ची साईज 5MB पेक्ष्या जास्त नसावी.
·
फॉर्म भरल्यानंतर, माहितीचे पुनरावलोकन करा आणि "सबमिट" बटणावर क्लिक करा.
· तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केला जाईल.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online Apply यासाठी तुम्हाला हमीपत्र माझी लाडकी बहिन PDF डाउनलोड करावी लागेल. दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी खालील प्रमाणे करा:
·
माझी लाडकी बहिन योजनेसाठी विशिष्ट पोर्टलला भेट द्या.
·
आता सर्च बॉक्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र PDF
शोधा.
·
PDF
डाउनलोड करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
·
पीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ती बरोबर भरावी लागेल.
·
तुमचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क तपशील आणि आधार क्रमांक टाका.
·
घोषित करा की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही.
·
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभागांमध्ये नियमित किंवा कायमस्वरूपी कर्मचारी नसल्याची खात्री करा.
·
तुम्ही रु. 1500 पेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही अन्य आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही हे सांगा.
·
तुमच्या कुटुंबाच्या जमिनीची मालकी आणि वाहन नोंदणीची स्थिती घोषित करा.
· आधार क्रमांक वापरून तुमची ओळख प्रमाणित करण्यास सहमती द्या.
माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती महिलांना होईल?
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
माझी लाडकी बहिन योजनेचा अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
अर्ज भरण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला/रेशन कार्ड (केशरी/पिवळा), हमी पत्र, बँक पासबुक. जर महिलेचा जन्म परदेशात झाला असेल तर तिच्या पतीची कागदपत्रेही आवश्यक असतील.